Monday 16 September 2013

वेगळा

राहिलो तुम्हात पण राहिलो मी आगळा
स्वप्न हे गुंफीत जातो छंद माझा वेगळा

कार्य हे अर्पित असतो दूर देशीच्या स्थळा
अंतरी शोधीत असतो छत्रपतींचा मावळा

उत्तरे शोधीत असतो, मार्ग क्रमितो स्वबळा
अंतरी विनवीत असतो गोकुळीचा सावळा

विनोदी बोल बोलतो  हासवाया वर्तुळा
ज्याची त्याला असती मग अंतरीच्या या कळा

वर्ण हे सोडीत जातो भेदीत जातो या मळा
ओलांडतो सीमा श्वास घ्याया मोकळा

No comments:

Post a Comment